Anjali27

Thursday, March 7, 2019

मैत्री... तुझी नी माझी...!!!

पावसाच्या थेंबाच शिंपल्यात पड़ण अन्
मोती म्हणून त्याच नवजीवन घडण...अगदी तसच
अनोळखी अनोळखी म्हणत असतानाच...
अचानक एकमेकांची सवय होवून जाण....म्हणजे
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
मोगऱ्याचा दरवळणारा मनमोहक गंध
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
चुकलेच कधी वाट तर दिशा दाखवणारा दीपस्तंभ
म्हणजे.....तुझी न माझी मैत्री.....
मनावरच न पुसल जाणार गोंदण....
म्हणजे....... तुझी न माझी मैत्री.....
जनु

                   रत्नाला दिलेल सोन्याच कोंदण....
म्हणजे....तुझी न माझी मैत्री.....
नकळत जडलेला एक स्वैर छंद.
म्हणजे.... तुझी न माझी मैत्री.....
मनापासून जपावासा वाटणारा हा रेशीमबंध
म्हणजे....तुझी न माझी मैत्री.....
तुझ्यासारखी खुप खुप वेडी.... अन् माझ्यासारखी थोड़ी थोड़ी खुळी....जशी कायम बहरलेली सदाफुली...
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
हसवणाऱ्या, फसवणाऱ्या तर कधी कंटाळवाण्या गप्पा..
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
मनात निर्माण झालेला तुझ्या आठवणींचा कप्पा...
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
कधी तुझ गोंधळूण टाकणार बोलणं...अन् माझ गोंधळणं
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
तु....... तुच म्हणताना आपण दोघेही म्हणणं अन्
तुला वेड ठरवताना मग दोघांनीही वेड होण....
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
मनाने मनाशी गुंफलेली सुंदर वीण अन्
तुझ्याशी बोलताना विसर पडलेला शीण
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
संसाराच्या गोतावळ्यात हरवुन जातील अशा पायवाटा अन्
'तु विसरलास तर..... या कल्पनेनेही अंगावर सरसरणार काटा.... म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
मंदिराचे पावित्र्य जपणारा घंटेचा जणु मंजुळ नाद
सुखदुःखात हक्काने आवर्जुन मारावी अशी साद
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
तु जरा खोडकर न खट्याळ... मी ही थोडीशी अल्लड अवखळ... आपणच बनवलेल अस हसरखेळत भावविश्व
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
अगदीच महागंड सुंदर फुलझाड़ नसेलही पण दुर्मिळ
गवताच एक नाजुक पात....
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
देवानेही हेवा करावा अन् प्रेमानेही लाजाव अस पवित्र नात
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
उतरत्या वयाच्या सांजवेळीही ऐकु यावी अशी सुंदर तान
आणि आयुष्याच्या रुपेरी पुस्तकात सुवर्णाक्षरांनी लिहाव
अस पान....
म्हणजे....तुझी न माझी मैत्री....
हसता हसता अलगद टीपाव अस डोळ्यातल पाणी..
अन्...
स्वप्नवत वाटणाऱ्या स्नेहबंध जपणाऱ्या पवित्र नात्याची 
अशी ही कहाणी...
म्हणजे....
               मैत्री.......
                             तुझी न माझी......!!!!!
                                                :)

3 comments: